गोजमगुंडे यांना जे जमलं ते ‘त्यांना’ जमेल का ?

 

गोजमगुंडे यांना जे जमलं ते ‘त्यांना’ जमेल का ?


लातूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त मा. खा. सुधाकरराव शृंगारे यांच्या संकल्पनेतून लातूर येथे 11 हजार चौरस फूट जागेवर बाबासाहेबांचे भव्य चित्र नोटबुकच्या माध्यमातून साकारण्यात आली आहे. या नोटबुक चित्राची नोंद वर्ल्ड रेकॉर्डस् इंडिया मध्ये करण्यात आली आहे. यामुळे लातूरच्या गौरवात भर पडली आहे.

या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतूक होत आहे. लातूरचे माजी महापौर विकरांत गोजमगुंडे यांनी फेसबुक वर एक पोस्ट शेअर करत या उपक्रमाचे कौतुक करताना म्हटले आहे की, अद्भुत.. अकल्पनीय.. राजकारण आपल्या ठिकाणी, पण चांगल्या कामाचे कौतुक केलेच पाहिजे. आपल्या लातूर मध्ये अठरा हजार नोटबुकच्या माध्यमातून भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा साकारण्यात आली आहे. कदाचित देशात प्रथमच अशी प्रतिमा साकारण्यात आली असावी. डोळ्याचे पारणे फेडणारी ही कलाकृती साकारणाऱ्या सर्व कलाकारांचे मनपूर्वक अभिनंदन आणि यासाठी पुढाकार घेणाऱ्या लातूरचे खासदार श्रीमान सुधाकरजी श्रंगारे यांचे विशेष अभिनंदन.

विरोधकांनी ही केलेल्या चांगल्या कामचे, उपक्रमाचे कौतुक करणे हे लातूरच्या सामाजिक व संस्कृतिक परंपरेचे घोतक आहे. विक्रांत गोजमगुंडे यांनी या उपक्रमाचे ज्या तत्परतेने कौतुक केले व ज्या शब्दात केले त्यावरुन कही पे निगाहे कही पे निशाना असे वाटण्यास वाव आहे. कारण विक्रांत ज्या पक्षाचे नेतृत्व करतात त्या पक्षाच्या नेत्यांनी लातूरच्या गौरवात भर पाडणाऱ्या या उपक्रमाची साधी दखल ही घेतली नाही. आता याला नेते जबाबदार की नेत्याचे सोशल माध्यम सांभाळणारे, त्यांना सल्ला देणारे जबाबदार हा संशोधनाचा विषय आहे.

पण विक्रांत गोजमगुंडे यांनी या उपक्रमाचे केलेले कौतुक व वापरलेले शब्द निश्चीतच दुसऱ्यांनाही दिशा दर्शक आहेत. हे मात्र निश्चीत.

Comments