लातूर शहरातील बॅकेसमोरील गाडी मधून भर दिवसा ३० लाखांची रोकड पळवली

 लातूर शहरातील बॅकेसमोरील गाडी मधून भर दिवसा ३० लाखांची रोकड पळवली



आयसीआयसीआय बँकेसमोरची घटना

लातूर शहरातील औसा रोड भागातील आयसीआयसीआय बँकेसमोर स्कार्पिओ गाडी थांबवून बॅंकेतून रक्कम काढण्यासाठी आत गेल्यानंतर गाडीतील तब्बल ३० लाखांची रोकड अज्ञात व्यक्तीने पळवली आहे. सर दुपारी रहदारीच्या रस्त्यावर ही घटना घडली आहे. घटनास्थळी तत्काळ पोलिस अधिकारी, कर्मचारी यांनी धाव घेतली असून तपास सुरू करण्यात आला आहे.

        प्राप्त झालेली अधिक माहिती अशी की, कर्मचाऱ्यांना रक्कम देण्यासाठी म्हणून शहरातील वेगवेगळ्या बॅंकांमधून रोकड काढण्याचे काम सकाळपासून सुरू होते. शहरातील दोन बॅंकांमधून रोख रक्कम काढण्यात आली होती. त्यानंतर तीच गाडी घेऊन चाकूर येथील एका बॅंकेतून रक्कम काढण्यात आली होती. औ

औसा रोड वरील आयसीआयसीआय बँकेच्या शाखेतून रोकड काढण्यासाठी गेल्यानंतर अज्ञात व्यक्तीने स्कार्पिओ गाडीची काच फोडली आणि आतील ३० लाख रुपयांच्या रोकडवर डल्ला मारला. सदरील चोरटा दुचाकीवर असल्याचे काहीजण सांगत होते. सकाळ पासून सदरील गाडीवर पाळत ठेवून हे काम करण्यात आले असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे. शहरातील वेगवेगळ्या ठिकाणावरील सीसीटीव्ही फुटेज तपासणी करण्यात येत आहे. अद्याप या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला नसला तरी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस अधिकारी, कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली व पाहणी केली.

Comments