युवासेना लातूर लोकसभा जिल्हाप्रमुख पदी विजय कसपटे यांची नियुक्ती

युवासेना लातूर लोकसभा जिल्हाप्रमुख पदी विजय कसपटे यांची नियुक्ती


लातूर / प्रतिनिधी : शिवसेना मुख्यनेते तथा उपमाख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश परिशा प्रताप सरनाईक, युवासेना मुख्य सचिव राहुल लोंढे, आणि युवासेना सचिव सचिन किरण साळी यांच्या विनंती नुसार शिवसेना पक्षाच्या युवासेना लातूर लोकसभा जिल्हा प्रमुख पदी विजय भैय्या कसपटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

सदरील नियुक्ती पत्र खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते मुंबई येथे विजय भैय्या कस्पटे यांना देण्यात आले. यावेळी मराठवाडा निरक्षक विपुल पिंगळे व लातूर निरीक्षक धिरज देशमुख व लोकसभा अध्यक्ष दिपांशु गारटे, कृष्णा आडे हे उवस्थिती होती.

विजय भैय्या कसपटे यांच्या निवडीबद्दल शिवसेना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विजय भैय्या कसपटे यांच्या मित्रपरिवाराकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

Comments