डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव; दिलीपरावजी देशमुख यांच्या हस्ते सार्वजनिक ध्वजारोहण

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव; दिलीपरावजी देशमुख यांच्या हस्ते सार्वजनिक ध्वजारोहण

लातूर प्रतिनिधी : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती मोठ्या उत्सहात साजरी करण्यात येत असून 14 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथील सार्वजनीक ध्वजारोहण माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते होणार आहे.

            14 एप्रिल रोजी सकाळी 9.30 वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक लातूर येथील ध्वजारोहण जयंती समितीचे अध्यक्ष प्रफुल कांबळे व जयंती अध्यक्ष मंडळाचे ॲङ विजय अवचारे यांच्या हस्ते होणार आहे. सायंकाळी शहराच्या विविध भागातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या मिरवणुका निघणार आहेत. माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची एका शिष्टमंडळाने भेट घेतली.

यावेळी राहुल कांबळे, सचिन गायकवाड, विनय जाकते, ॲङ आनंद सोनवणे, बाबासाहेब कांबळे, रवि गायकवाड, लक्ष्मण कांबळे, चंद्रकांत चिकटे, प्रा. अनंत लांडगे प्रा. जितेंद्र गायकवाड, अमोल शिंदे, विनोद कोल्हे, पवन आल्टे, आदी उपस्थिती होते. 

Comments