निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मांडलेला अर्थसंकल्प : आमदार धिरज देशमुख

निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मांडलेला अर्थसंकल्प : आमदार धिरज देशमुख

शेतकऱ्यांच्या शेतीमालाला रास्त भाव मिळाला तर शेतकरी खऱ्या अर्थाने स्वयंपूर्ण होतील. पण, अशा मूळ आणि महत्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून 'वर्षाला ६ हजार' सारख्या केवळ चमकदार घोषणा राज्य सरकारने अर्थसंकल्पाच्या माध्यमातून केल्या आहेत. या तुटपुंज्या रक्कमेतून शेतकरी बांधवांचे अर्थकारण कसे सुधारणार?

मराठवाडा दुष्काळ मुक्त करू, अशा घोषणा वारंवार दिल्या जातात. पण, त्यादृष्टीने मराठवाड्याला ठोस काहीही देण्यात आले नाही. लातूरमधील विमानतळ, रुग्णालय, रस्ते, पाणी असे अनेक महत्वाचे विषय सरकारसमोर आहेत. पण, त्याची योग्य दखल घेतली गेली नाही. त्यामुळे लातूरकरांसाठीही हा अर्थसंकल्प निराशाजनक ठरला आहे.

महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे राजस्थान सरकारने ठोस पावले टाकून गॅस सिलिंडरचे दर ५०० रुपये करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. अशा निर्णयांचे अनुकरण आपल्याकडे व्हायला हवे होते. मात्र, महागाई, बेरोजगारी, जुनी पेन्शन, मोफत वीज याबाबत कुठलाही दिलासादायक निर्णय राज्य सरकारने घेतला नाही.

आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारने मांडलेला अर्थसंकल्प सर्वसामान्यांची दिशाभूल करणारा आहे.

Comments