व्हाईस ऑफ मीडिया (साप्ताहिक विंग) च्या प्रदेश सरचिटणीसपदी वामन पाठक यांची निवड
लातूर (दि.1) : लातूर येथील सा. मनोकामनाचे संपादक वामन पाठक यांची व्हाईस ऑफ मीडिया (साप्ताहिक विंग)च्या प्रदेश सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीचे पत्रकारितेच्या क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे.
महाराष्ट्रात पत्रकार आणि पत्रकारीता क्षेत्रावर होणार्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी, शासन वृतपत्र क्षेत्रातील पत्रकारासह मिडीयाचा केवळ त्यांच्या कामकाजाला प्रसिध्दी देण्यासाठी उपयोग करत आहे. आणि पत्रकारांना सोई सुविधा देण्याचे मात्र टाळत आहे. या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी व्हॉईस ऑफ मीडिया कार्यरत आहे. यासाठी वेगवेगळया क्षेत्रातील विंग बनवण्यात आले आहेत. यातील साप्ताहिक विंगच्या प्रदेश सरचिटणीसपदी लातूर येथील साप्ताहिक मनोकामनाचे संपादक वामन कालिदासराव पाठक यांची व्हाईस ऑफ मीडिया (साप्ताहिक विंग) च्या प्रदेश सरचिटणीसपदी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिप काळे, प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के, साप्ताहिक विंगचे प्रदेश अध्यक्ष विनोद बोरे यांनी निवड जाहिर केली आहे.

Comments
Post a Comment