कृ.उ.बा. समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर शिवसेना (शिंदे गटाच्या) पदाधिकार्यांची माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकरांशी भेट
कृ.उ.बा. समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर शिवसेना (शिंदे गटाच्या) पदाधिकार्यांची माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकरांशी भेट
लातूर (दि.24) : लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून सत्ताधार्यांच्या विरोधात सर्वांनी एकजुटीने काम करण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यात आलेला आहे. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा नावलौकिक राज्यामध्ये करण्यासाठी पुन्हा करण्यासाठी भाजपा, शिवसेना शिंदे गटासह विविध पक्षाच्या समविचारी नेते, पदाधिकार्यांनी गाठीभेटीवर भर दिला आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवरच शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अॅड. बळवंतभाऊ जाधव यांनी भाजपा नेते तथा किसान मोर्चा गोवा राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांची सदिच्छा भेट घेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीबाबत सविस्तर चर्चा केली यामुळे आता बाजार समितीच्या निवडणुकीची रंगत वाढणार आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून ही निवडणूक मोठ्या ताकतीने लढवून सत्ताधार्यांच्या हातातून ताब्यात घेण्याचा निर्णय भाजपा, शिवसेनेसह सर्वच समविचारी पक्षांनी घेतलेला आहे. या बाजार समितीच्या निवडणुकीच्या पाश्वभूमिवरच शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा जिल्हाप्रमुख अॅड.बळवंतभाऊ जाधव यांनी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकरांची जेएसपीएम शिक्षण संस्थेच्या संस्था कार्यालयात जाऊन भेट घेतली आणि कव्हेकरांच्यावतीनेही त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
यावेळी भाजपाचे ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष निळकंठराव पवार तसेच शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अॅड.बळवंतभाऊ जाधव यांच्यासोबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक संभाजी वायाळ, तांदूळजा येथील विजय देशमुख, शिवसेनेचे रमेश सूरवसे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments
Post a Comment