सिद्धेश्वर कॉ - ऑप. हाउसिंग सोसायटीच्या अध्यक्षपदी शहाजीराव पाटील यांची बिनविरोध निवड

 सिद्धेश्वर कॉ - ऑप. हाउसिंग सोसायटीच्या अध्यक्षपदी शहाजीराव पाटील यांची बिनविरोध निवड



श्री सिद्धेश्वर हाऊसिंग सोसायटी लातूर अध्यक्षपदी शहाजी पाटील, सचिव एल.बी. आवाळे तर कोषाध्यक्ष सौ .सुरेखा केंद्रे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सोसायटीच्या कार्यालयामध्ये त्यांचा सत्कार करतेवेळी नूतन संचालक भताने रमेश, श्रीमती केशरबाई काळे, प्रकाश कुलकर्णी, वावरे विश्वास, नाईक सुधाकर व निवडणूक निर्णय अधिकारी महाजन आर .एम.


लातूर : लातूर शहरातील अत्यंत नावलौकिक श्री सिद्धेश्वर हाउसिंग सोसायटी च्या नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक रविवार (दि-19) रोजी सोसायटीच्या सभागृहामध्ये झाली. यामध्ये सर्वानुमते शहाजीराव पाटील यांची अध्यक्ष म्हणून, सचिवपदी एल.बी. आवळे तर कोषाध्यक्षपदी सौ सुरेखा केंद्रे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.


लातूर शहरातील अत्यंत जुनी, 1964 मध्ये स्थापन झालेल्या सिद्धेश्वर हाऊसिंग सोसायटी संचालक, अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष बिनविरोध निवडीची परंपरा यावर्षी देखील कायम राखली आहे. शहाजीराव पाटील यांची 1998 पासून ते आज पर्यंत अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झालेली आहे. या निवडी प्रक्रियेसाठी सोसायटीतील सर्व सभासदांनी सहकार्य केले .नूतन अध्यक्ष, सचिव, व कोषाध्यक्ष यांनी सर्व सभासद यांचे आभार मानून पुढील काळात सोसायटी मध्ये येणाऱ्या समस्या, अडीअडचणी दूर करण्याचे आश्वासन दिले. या निवडणूक कार्यक्रमासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून महाजन आर एम यांनी काम पाहिले.

Comments