जेएसपीएम संस्थेच्या रोजगार मेळाव्यातून विद्यार्थ्यांना मिळणार नोकरीची संधी
लातूर (दि.22) : स्वतंत्र्य मायक्रो फायणांन्स प्रा.लि. व जेएसपीएम शिक्षण संस्था,लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने जेएसपीएम कॅम्पस पी-74, एमआयडीसी, कळंब रोड, लातूर येथील पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या सभागृहात घेण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यामध्ये मुलाखती दिलेल्या उमेदवारांना आता अंतिम यादीची प्रतिक्षा लागली आहे.
जेएसपीएम संस्थेच्यावतीने आयोजित रोजगार मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जेएसपीएम संस्थेचे एचआर डायरेक्टर राहुल आठवले हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मायक्रो फायणांन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे साईरेड्डी सर, विवेकानंद सर, आयटीआयचे प्राचार्य संदीप पांचाळ यांच्यासह जेएसपीएम संस्थेच्या एमआयडीसी कॅम्पसमधील सर्व युनिटप्रमुख उपस्थित होते.
रोजगार मेळाव्याचे प्रास्ताविक स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य मनोज गायकवाड यांनी केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, जेएसपीएम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व जेएसपीएम संस्थेचे उपाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या नेतृत्वात जेएसपीएम संस्थेची वाटचाल यशस्वीपणे चालू आहे. जेएसपीएम संस्थेच्या ट्रेनिंग व कॅम्पस प्लेसमेंटकरीता राबविल्या जाणार्या विविध उपक्रमाची माहिती देऊन विद्यार्थ्यांना प्लेसमेंटसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच स्वतंत्र्य मायक्रो फायणांन्स प्रा.लिमिटेडचे साईरेड्डी सर यांनी कंपनीबद्दलची माहिती देऊन रिलेशन ऑफीसर व फिल्ड ऑफीसर या पदाबद्दलच्या संधी, पात्रता, नियम व अटी या सर्व बाबीची सखोल माहिती ईच्छूक विद्यार्थ्यांना दिली तर जेएसपीएम संस्थेचे एचआर डायरेक्टर राहूल आठवले यांच्या भाषणाने विद्यार्थ्यांच्या कॅम्पस प्लेसमेंटचा समारोप करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राध्यापक महेश आदमिले यांनी केले तर आभार पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य राजकुमार साखरे यांनी मानले. यावेळी जेएसपीएम संस्थेच्यावतीने आयोजित या रोजगार मेळाव्यास विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Comments
Post a Comment