मुख्य कार्यकारी अधिकारी गोयल यांच्या हस्ते श्री सिद्धेश्वरांची महापूजा 

लातूर/प्रतिनिधी : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते ग्रामदैवत श्री सिद्धेश्वरांची महापूजा करण्यात आली.लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानचा महाशिवरात्री यात्रा महोत्सव सुरू आहे.

यानिमित्त अभिनव गोयल यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली.गोयल यांनी सपत्निक श्री सिद्धेश्वरांची मनोभावे पूजा करून दर्शन घेतले.यावेळी देवस्थानचे प्रशासक तथा निरीक्षक सचिन जांबुतकर,विश्वस्त मंडळाचे विक्रमतात्या गोजमगुंडे, बाबासाहेब कोरे,नरेश पंड्या, अशोक भोसले,सुरेश गोजमगुंडे यांच्यासह विश्वस्तांची उपस्थिती होती.यात्रा महोत्सवानिमित्त देवस्थानच्या वतीने भक्तांसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या सोयीसुविधांची पाहणी करून गोयल यांनी समाधान व्यक्त केले.

Comments