विद्यार्थ्यांना शाळे मध्ये आर्थिक साक्षरतेचे धडे : बचत व खर्च कार्यशाळा उत्साहात संपन्न

विद्यार्थ्यांना शाळे मध्ये आर्थिक साक्षरतेचे धडे : बचत व खर्च कार्यशाळा उत्साहात संपन्न

लातूर प्रतिनिधी : डी. आर. टी. ई. फोऊडेशन, नांदेड या संस्थेद्वारे इयता ८ ते १२ च्या विद्यार्थ्यांना लातूर येथील सरस्वती महाविद्यालयामध्ये फायनाशियल लीटरसी (आर्थिक साक्षरता) कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत संस्थेच्या समन्वयीका प्रीती आगाशे यांनी विद्यार्थ्यांना पैशाची बचत व खर्च या बाबत सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले.

यामध्ये 9 प्रकार असून हा धन ज्ञान कोर्स आहे, या मध्ये रिटारमेंट,  मॅच्यूअल फंड , इन्सुरांचे प्रकार बँके प्रकार, लोन ई विषयी माहिती देण्यात आली. या कार्यशाळेत महाविद्यालय  व शाळेतील ११५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व भविष्यातील येणाऱ्या आर्थिक अडचणी यावर माहिती जाणून घेतली. हा कोर्स पूर्ण करून घेण्याचा मानस मुख्याध्यापक व शिक्षक यांनी यावेळी व्यकृत केला.

विद्यार्थ्यांना आर्थिक कार्यशाळेचे आयोजन लातूर जिल्यातील सर्व महाविद्यालय व शाळा मध्ये देण्याचे मत संस्थेचे अध्यक्ष कृष्णा गोरे यांनी व्यक्त केले.


Comments