9 व्या राष्ट्रीय रॉकीट बॉल पुरुष व महिला स्पर्धेचे लातूर येथे आयोजन

लातूर - यथील जिल्हा क्रीडा संकुलात दिनांक 6 ते 8 जानेवारी 2023 दरम्यान 9 व्या राष्ट्रीय रॉकीट बॉल पुरुष व महिला स्पर्धेचे  आयोजन करण्यात आले आहे. येथील लातूर पॅटर्न केवळ शिक्षणाच्या क्षेत्रातच देशात प्रसिद्ध नसून क्रीडा क्षेत्रातही देशभरात पोचला आहे. सदरील स्पर्धेच्या निमित्ताने देशभरातील अनेक राज्याचे संघ लातूर येथे येत आहे. सदरील क्रीडाप्रकारची स्पर्धा लातूर येथे पहिल्यांदाच होत असल्याचे महाराष्ट्र असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी शेख हसन यांनी सांगितले.

    सदरील स्पर्धेचे उद्घाटन दिनांक 7 जानेवारी रोजी दुपारी 4 वा. होणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार तर उद्घाटक म्हणून माजी राज्यमंत्री तथा उदगीरचे आमदार संजय बनसोडे उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी भारतीय महासंघाचे जनरल सेक्रेटरी प्राचार्य बलविंदर सिंह, महाराष्ट्र राज्य असोसिएशनचे अध्यक्ष मोहन दाढी, माजी जी. प. सभापती कल्याण पाटील, उप संचालक आरोग्य विभाग लातूरचे डॉ. कमलताई चामले, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, डॉ. हणमंत वडगावे, शेख गफारसाब, डॉ. अशोक बडे, महेंद्र कुमार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

    तर दिनांक 8 जानेवारी रोजी सायंकाळी स्पर्धेचे बक्षीस वितरण असून या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एल. एस. देशमुख, तर बक्षीस वितरक लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अमय मुंडे उपस्थित राहणार आहेत. यावेळी लातूरचे जिल्हाधिकारी बी. पी. पृथ्वीराज यांची विशेष उपस्थित राहणार आहे. तसेच डॉ. संजय ढगे, संजय सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 

    कोरोना प्रतिबंधक काळानंतर प्रथमच लातूरमध्ये सदरील स्पर्धेचे भव्य आयोजन होत असल्यामुळे सदरील स्पर्धेचा आनंद लातूर व लातूर परिसरातील सर्व क्रीडाप्रेमींनी घ्यावा असे आवाहन स्पर्धेचे संयोजक बी. एस. माशाळे, नौशाद पठाण, अशोक गुरदाळे यांनी केले आहे.

Comments