केशवराज विद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती


केशवराज विद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती 


लातूर / प्रतिनिधी: येथील श्री.केशवराज माध्यमिक विद्यालयात भारताचे पहिले गृहमंत्री,लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

    या कार्यक्रमात विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील वसमतकर, पर्यवेक्षक बबन गायकवाड,ज्येष्ठ शिक्षक धनंजय कुलकर्णी, गुरूनाथ झुंजारे यांनी प्रतिमापूजन केले.कार्यक्रम प्रमुख श्रीमती क्षमा कुलकर्णी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवन कार्याविषयी माहिती सांगितली.कु.अनुष्का तिडके या दहावीच्या विद्यार्थिनीने एकतेची शपथ सांगितली. तिच्यासोबत सर्व विद्यार्थी, शिक्षक यांनीही एकतेची शपथ घेतली.

    या कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका व इयत्ता दहावीचे विद्यार्थी उपस्थित होते.

Comments